प्रेम संदेश..

Posted by मधुरा on 12:54 AM
           संस्कृतातील सर्वात पहिली प्रेम कथा...
           कुबेराची राजधानी अलकापुरीमधली गोष्ट... यक्षराज कुबेराच्या पूजाघरात सर्व काम करण्यासाठी एका यक्षाची नियुक्ती होते. यक्षाचं त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम असतं. कामाच्या निमित्तानी सुद्धा त्याला तिच्या दूर राहणं जमत नाही.. त्याचा परिणाम असा होतो की एक दिवस त्याच्याकडून कुबेराच्या कामात चूक होते आणि पुजेची तयारी करायला उशीर होतो.. कुबेराला हे सहन होत नाही आणि तो यक्षाला शिक्षा म्हणून १ वर्ष देशाच्या बाहेर हाकलून देतो.. आणि म्हणतो, "ज्या पत्नीच्या विचारात राहून तू ही चूक केली, आता तुला १ वर्ष तिचा विरह सहन करावा लागेल.. तुला एकट्यालाच १ वर्ष देशाच्या बाहेर राहावं लागेल!"
           कुबेरानी दिलेली शिक्षा ऐकून यक्ष कासावीस होतो.. पण काही पर्याय नसतो! १ वर्ष घालवण्यासाठी तो रामगिरी पर्वतावर ऋषींच्या आश्रमात जातो आणि शिक्षा संपण्याचे एक एक दिवस मोजू लागतो.. ज्या पत्नीच्या विरहात तो एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हता, तिच्या विरहात तो आठवणीने कासावीस होतो.. तब्बेत खालावते..
           आठवणीत दिवस मोजत मोजत काही महिने निघून जातात.. उन्हाळ्याचे दिवस संपून आषाढ महिना येतो. आषाढ महिन्यातल्या मेघ बघून त्याला त्याच्या पत्नीची तीव्रतेने आठवण येते.. त्याच आठवणीत तो कितीतरी वेळ तसाच मेघांकडे बघत बसतो.. विचार करतो की 'माझी तिच्या आठवणीने ही अवस्था झाली आहे तर माझ्या पत्नी सुद्धा आठवणीने व्याकूळ झाली असणार..' असाच मेघांकडे पाहता पाहता त्याच्या मनात विचार येतो की, 'या मेघांच्या माध्यमातूनच मी माझा निरोप माझ्या पत्नीला पाठवू काय?'
           पत्नीला निरोप पाठवण्याच्या विचारानी आनंदी झालेला यक्ष त्या मेघाजवळ जाऊन त्याची पूजा करतो.. स्तुती करतो.. आणि त्याला स्वतःची सर्व हकीकत सांगतो. पुढे त्याला विनवतो की, "तू पृथ्वीवर तापलेल्या जीवांना तुझ्या थंडाव्याने शांत करतो, तसंच माझ्या आठवणीने व्याकूळ झालेल्या माझ्या पत्नीला तू तुझ्या शीतल वर्षावानी आल्हादित करू शकतो.. माझा निरोप तूच तिच्या पर्यंत नेऊ शकतो.."
त्या मेघाला विरहात कृश झालेल्या यक्षाची दया येते.. तो निरोप पोहोचवण्यासाठी संमती देतो.. आपला निरोप पत्नीपर्यंत पोहोचणार या विचारात यक्ष आनंदित होऊन मेघाला पत्नीला सांगण्यासाठी निरोप देतो.. आणि अलकापुरीला जाण्याचा मार्ग समजावून सांगतो.
           यक्षानी सांगितलेल्या मार्गांनी तो मेघ अलंकापुरीत यक्षाच्या घराजवळ जाऊन पोहोचतो. पाहतो तर यक्षाच्या पत्नीची अवस्था सुद्धा याक्षाप्रमाणे व्याकूळ झालेली.. मेघ यक्षाच्या पत्नीला यक्षाचा निरोप देतो, "मी इथे इतक्या दूर सुद्धा सतत तुझी आठवण करत आहे.. निसर्गाच्या प्रत्येक सौंदर्यात मला फक्त तुझेच दर्शन होत आहे.. तुझ्या इतक्या दूर राहिल्यामुळे कशातही माझे मन रमत नाही.. मला माहित आहे तुझी अवस्था सुद्धा याहून वेगळी नक्कीच नाही. पण तू धीर धर. माझी शिक्षा संपायला आता थोडेच महिने उरले आहेत. हे काही महिने तू स्वतःची काळजी घे. मी लवकरच तुझ्याजवळ परत येईन.."
           यक्षाचा निरोप ऐकून त्याच्या पत्नीला खूप आनंद होतो. शिक्षेचे राहिलेले काही महिने घालवायला तिला धीर मिळतो. पण जेव्हा कुबेराला कळतं की शिक्षा मिळालेल्या याक्षानी त्याच्या पत्नीला मेघाकडून संदेश पाठवला, तेव्हा कुबेराला सुद्धा त्याची दया येते आणि तो यक्षाची शिक्षा माफ करतो आणि त्याला परत बोलावून घेतो..
           यक्ष आणि त्याची पत्नी पुन्हा एकदा सुखाने राहू लागतात.. आणि कुबेर सुद्धा त्या दोघांना पुन्हा काही दुःख होणार नाही याकडे लक्ष देतो..

Still life painting

Posted by मधुरा on 12:30 AM
still life प्रकारचं मी बनवलेलं painting आज blog वर लावते आहे. हे चित्र dry pastel ने बनवले आहे. बालगंधर्वला exhibition मध्ये माझे ३ paintings लागले होते त्यातील हे दुसरे. exhibition मध्ये लागलेले पहिले painting पाहण्यासाठी येथे click करा. तुमचा अभिप्राय नक्की कळवा. :)

शेवटची इच्छा..

Posted by मधुरा on 11:12 PM
           एका छोट्या गावात एक शेतकरी राहत असतो. शेतकरी गरीब पण खूप मेहनती असतो. गरीबीतून वर यायला तो खूप कष्ट करत असतो.. देव त्याला त्याच्या मेहनतीचं फळ सुद्धा देतो. त्याच्या घरी सुबत्ता येते. पण आलेल्या श्रीमंतीचा गर्व न करता तो प्रगती करत असतो. त्या शेतकऱ्याला ४ मुलं असतात. पण त्याची मुलं श्रीमंतीत वाढल्यामुळे मेहनत करून पैसे कमावणं त्यांना माहितीच नसतं! पैसे उधळणं आणि मजा करणं हेच त्यांचं आयुष्य असतं.. मुलांचं असं वागणं बघून शेतकऱ्याला खूप काळजी वाटत असते. त्यांनी कष्ट करून काम करावा म्हणून शेतकरी मुलांना खूप समजावतो. पण कोणातही फरक पडत नाही. आपण मुलांना चांगल्या मार्गावर आणू शकलो नाही याचं त्याला खूप दुःख असतं.
          मुलांच्या काळजीमुळे शेतकरी आजारी पडतो. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत जाते. त्याला कळतं की या आजारातून आपण काही बरे होऊ शकत नाही. तो मुलांना जवळ बोलवतो आणि सांगतो, "या आजारातून मी बारा होईल असं मला वाटत नाही. तुम्हाला मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला.. पण काही फायदा नाही.. माझ्यानंतर तुमचं कसं होणार याचीच मला काळजी वाटते. असो... मला काही झालं तर माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल का?"
          वडीलांचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना गहिवरून येतं. ते शेतकऱ्याला म्हणतात, "बाबा, तुमच्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करू.. तुम्ही जे सांगाल ते करू.. आम्ही कष्ट करून पैसे कमाउ.."
शेतकरी सांगतो, "मी तुम्हाला ४ गोष्टी सांगतो त्या तुम्ही रोज न चुकता करायच्या..
पहिली - सावलीतून जा आणि सावलीतून या..
दुसरी - रोज गोड-धोड खा..
तीसरी - मऊ मऊ झोपा..
चौथी - गावोगावी घरं बांधा.."
काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू होतो.. सर्वांनाच खूप दुःख होतं..
           शेतकऱ्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल त्याचे मुलं विचार करू लागतात. आणि शेतकऱ्यांनी सांगितलेल्या इछेचा मुलं आपल्या सोयीनी अर्थ काढतात!
पहिली गोष्ट, सावलीतून जा आणि सावलीतून या.. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी चारही मुलं स्वतःसाठी कार घेतात. कुठेही ये-जा करण्यासाठी कार वापरतात.
दुसरी, रोज गोड-धोड खा.. यासाठी मुलं घरी आचारी ठेवतात आणि त्याला रोज जेवणात गोड बनवायला सांगतात!
तीसरी, मऊ मऊ झोपा.. मुलं मऊ झोपण्यासाठी मऊ गाद्या बनवून घेतात आणि रेशमाची चादर टाकून त्यावर झोपतात..
चौथी गोष्ट सांगितली असते, गावोगावी घरं बांधा.. चारही मुलं वेगवेगळ्या गावात घरं बांधायला लागतात.
           असंच एक वर्ष उलटून जातं. त्यांच्या जवळ असलेले पैसे संपायला लागतात. कमाईचा मार्गच त्यांच्या जवळ नसतो! त्यामुळे त्यांना कर्ज घेऊन घर चालवावं लागतं. शेतकऱ्याच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सगळे मुलं विचार करतात की आपल्या वडिलांनी अशी इच्छा का सांगितली? त्यांच्या इच्छेप्रमाणे वागलो आणि घरातली सर्व सुबत्ता गेली! वडिलांनी नेहमीच आपल्याला पैसे जोडायला सांगितले पण शेवटची इच्छा अशी सांगितली की घरात होते नव्हते सगळेच गेले! चारही मुलं शेतकऱ्याला दोष देऊ लागतात!
           मुलं असंच विचार करत असतात तेवढ्यात शेतकऱ्याचा एक मित्र त्यांच्या घरी येतो. मुलांची अशी अवस्था झालेली पाहून त्याला सुद्धा वाईट वाटतं. तो मुलांना विचारतो, "काय रे? तुमची अशी अवस्था कशी काय झाली? तुम्ही इतके श्रीमंत होतात मग एका वर्षात असं काय झालं?"
मुलं खजील होऊन सर्व हकीकत सांगतात.. आणि म्हणतात, "काका, तुम्हीच बघा.. बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलो आणि आमची ही अवस्था झाली! आम्ही बाबांचं ऐकलं हीच आमची चूक झाली!"
           हे सर्व ऐकून शेतकऱ्याचा मित्र त्यांना म्हणतो, "अरे बाळांनो, वडिलांचं ऐकलं ही तुमची चूक नाही.. तर त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला ही तुमची चूक झाली आहे! तुमचे वडील तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? अरे, 'सावलीतून जा सावलीतून या' याचा अर्थ सुर्योदया आधी कामावर जा आणि दिवसभर काम करून सूर्यास्तानंतर सावलीतून या! दिवसभर काम करून, थकून, तुम्ही जे जेवल ते तुम्हाला गोडच लागेल! याचाच अर्थ गोड-धोड खा! तसंच थकलेल्या माणसाला दगडावर सुद्धा मऊ आणि शांत झोप लागते. हीच तुमच्या वडिलांनी सांगितलेली तीसरी गोष्ट! आणि गावोगावी घरं बांधा ही चौथी गोष्ट ना? अरे म्हणजे तुम्ही ज्या गावी जाल तिथल्या लोकांना आपलंसं करा. त्यांच्या घरातील एक होऊन राहा. असे घरं तुम्ही गावोगावी बांधा!
           अरे तुमच्या वडिलांना तुम्ही ओळखलंच नाहीत का? त्यांच्या इछेचा इतका चुकीचा अर्थ काढलात? आता तरी त्यांची इच्छा ओळखून कष्ट करा.. आणि सुखा-समाधानानी राहा..."

असं का करायचं?? (भाग ४)

Posted by मधुरा on 10:59 PM
          अलंकारांबद्दल महत्वाच्या अशा काही गोष्टी मी लिहिल्या.. त्यात राहिलेल्या काही आज लिहिते..

           बिंदी : बिंदी च्या पदकाचा कपाळावर जिथे स्पर्श होतो त्या बिन्दुमुळे tonsils आणि उच्चदाबावर नियंत्रण राहतं..

           पैंजण : पायातले पैंजण फक्त वाजण्यासाठी... चाहूल येण्यासाठी नाहीत!! तिथे किडनी, दमा, sciatica, पाठीचा कणा, गुडघेदुखी अशा रोगांचे निवारण करणारे बिंदू..

           जोडवी : सुरवातीला पायात रुतणारी जोडवी डोळ्यांची आणि कानांची काळजी घेतात!!

           "असं का करायचं" या विषयाच्या तीनही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.. आजचा "असं का करायचं" मध्ये अलंकाराविषयी शेवटचा भाग. मला अलंकाराबद्दल जे माहिती होते ते सगळं लिहिलं.. याशिवाय तुम्हाला जे माहिती असेल ते नक्की सांगा.. मला सुद्धा ऐकायला आवडेल.. :)

हिऱ्याची अंगठी

Posted by मधुरा on 1:49 AM
          मी photoshop मध्ये बनवलेलं अजून एक चित्र आज blog वर लावते आहे. एका हिऱ्याची अंगठी मी या software मध्ये बनवलेली आहे. यात खूप detail काम केलंय. त्यामुळे या चित्राला खूप वेळ द्यावा लागला. हिऱ्याचं अप्रतिम सौंदर्य काढण्याचा प्रयत्न जमला की नाही ते नक्की सांगा.. :)
































या चित्राच्या वेगवेगळ्या layers तुम्ही बघू शकता...







Background

Posted by मधुरा on 1:30 AM
        मी staedtler color pencils ने हे चित्र बनवलंय. class मध्ये शिकत असताना हे चित्र बनवलं. हे चित्र बनवायला मला ३ दिवस लागले. बालगंधर्व मध्ये exhibition ला हे चित्र लावलेलं होतं. कसं बनलंय हे नक्की कळवा.. :)

असं का करायचं?? (भाग ३)

Posted by मधुरा on 12:03 AM
          मुलगा असो की मुलगी.. गळ्यात साखळी घालताना तरी आपण स्त्री-पुरुष हा भेदभाव करत नाही... सगळेच गळ्यात साखळी घालतात.. पण ती का घालायची?? असा प्रश्न पडला असेल ना....  

          गळ्यात एकसर का घालायची??
          गळ्यातल्या एकसरीचा गळ्याच्या दोन्ही बाजूला खांद्याशी जिथे स्पर्श होतो हे बिंदू आहेत प्रेमाचे.. वात्सल्याचे.. मायेचे..
           प्रेम, वात्सल्य यामुळेच तर आपल्या आयुष्यात आनंद आहे! जिथे प्रेम नाही तिथे जीवनात काय आनंद राहिला?
           तसंच एकसरीचा गळ्याशी आलेल्या मण्यामुळे सर्दी, कफ यामुळे येणाऱ्या दम्यावर नियंत्रण रहातं!


          दुसरा प्रश्न असा की नाकात नथ का घालायची?
          आजकाल लग्न किंव्वा मोठ्या कार्यक्रमातच आपण नथ घालतो.. आणि एरवी एक छोटासा सोन्याचा मणी.. पण त्याचा काही उपयोग नाही! आधी जशी मोठी नथ घालायचे त्यामुळे दात दुखणे.. हिरड्या सुजणे.. तसंच उन लागून नाकातून रक्त येणे असे त्रास होत नाहीत..

(पण नथ हा अलंकार पुरुषांसाठी नाही... त्यांना या त्रासातून वाचण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे!! :D )

मी बनवलेले मामीचे चित्र

Posted by मधुरा on 1:07 AM
हे चित्र मी staedtler color pencils ने काढले आहे. मी pencil  ने  काढलेले आई आणि बाबांचे चित्र तुम्ही blog वर पाहिले आहे.. हे माझ्या मामीचं चित्र कसं बनलंय हे नक्की कळवा..


 मी काढलेले आई आणि बाबांचे चित्र पाहण्यासाठी खालच्या link  वर click  करा.

दोन चिमुकले जीव

Posted by मधुरा on 11:47 PM
प्राणी, पक्षी यांना स्वतंत्र ठेवावे असं सगळे म्हणतात.. पण एक गोष्ट अशी झाली की नक्की काय करावं कळत नाही.. माझ्या लहान बहिणीच्या मैत्रिणीला एक मांजर खारीच्या आणि खारीच्या पिल्लांच्या मागे लागलेली दिसली.. खार तिच्या पिल्लांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होती! मैत्रीण तिच्या मदतीला तिच्या पर्यंत पोहोचली तोवर ती पिल्लांना तर वाचवू शकली पण स्वतःला वाचवू शकली नाही... मैत्रिणीनी पिल्लांना उचलून घेतलं आणि स्वतःजवळ ठेवलं.. त्या छोट्याश्या जीवाला वाचवता वाचवता त्यांच्या आईनी स्वतःची पर्वा केली नाही.. त्यांना कसं एकटे सोडून देणार ना?

          मैत्रिणीनी त्या पिल्लांना घरी नेलं आणि त्यांना सांभाळायचं ठरवलं.. पण ते पिल्लू इतके छोटे होते की तिला त्यांना काय खाऊ घालावं कळेना! ते काहीच खात पीत नव्हते.. त्यांना कसं सांभाळावा ते तिला कळत नव्हतं.. म्हणून आम्ही त्या पिल्लांना आमच्या घरी घेऊन आलो.. लहान पिल्लांना कापसाच्या बोळ्यानी दुध देतात असं आईनी सांगितलं.. तर खरंच कापसाचा बोळा त्यांच्या जवळ नेताच त्यांनी दुध घेतले!

          खारीसारख्या छोट्याशा सुंदर प्राण्याला हातात घ्यायची खूप इच्छा होती.. पण इतका चपळ प्राणी चाहूल लागताच पळून जातो तर हातात कसा येणार? पण ती इच्छा पूर्ण झाली! गेले २ दिवस ते पिल्लू आमच्या घरी आहेत.. इतक्या छोट्याश्या जीवाला हाताळताना.. त्यांना खाऊ घालताना.. त्यांना इकडून तिकडे पळताना बघून किती आनंद वाटतो हे सांगू नाही शकत.. प्रत्येक क्षणाला मैत्रिणीचं कौतुकच वाटतं.

ते पिल्लू इतक्या थोड्या वेळात कुटुंबाचा एक भाग झाले आहेत.. इतक्या नाजूक.. छोट्या पिल्लांचे नाव काय ठेवायचे ते अजून सुचले नाही... तुम्ही सुचवा... आणि त्यांची काळजी घेताना काय लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगा.. :)

मांजरीचं चित्र

Posted by मधुरा on 1:08 AM
photoshop या software मध्ये मी हे मांजरीचं चित्र बनवलंय.. मांजरीचं fur बनवणं थोडं कठीण होतं म्हणूनच हे चित्र बनवण्याचा प्रयत्न केला.. हे चित्र बनवायला ५ तास लागले.. चित्र कसं बनलंय हे नक्की कळवा..



या चित्राच्या वेगवेगळ्या layers तुम्ही बघू शकता..


















असं का करायचं?? (भाग २ )

Posted by मधुरा on 11:12 PM
           'असं का करायचं' या पहिल्या post मध्ये मी २ प्रश्न लिहिले होते. गंध का लावायचं? कान का टोचायचे? मला मिळालेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरं लिहिते आहे.
           बाळाला मनगट्या, स्त्रीने बांगड्या आणि पुरुषांनी कडे घालण्याची पद्धत का होती?
बाळाचा जन्म झाला की त्याला/तिला मनगट्या, करदोडा, साखळी, अंगठी घालतात.. त्यातल्या मनगट्या पुढे स्त्रीसाठी बांगड्या आणि पुरुषासाठी कडे बनतात.. बाळाला काय कळतात अलंकार? नाही का? पण ते त्याच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.. हातात अलंकार घालताना मनगटावरील बिंदू ५-६ सेकंद तरी दाबले जातात.. डाव्या हातावर हृदयाचे, शक्तीचे, श्वासाचे आणि आरोग्य रक्षण करणारे बिंदू आहेत.. तर उजव्या हातावर पुरुषांचे प्रोस्टेट ग्रंथीचे, आणि मुलींच्या गर्भाशयाचे बिंदू आहेत..... पाहिलंत? एका छोट्या अलंकारामागे कसे आरोग्य विज्ञान आहे!!
           बाळ अंगठा का चोखतो?
          बाळाने अंगठा चोखला की त्याच्या मेंदूतील अभिसरणाला चालना मिळते.. अंगठ्यावर आहेत मेंदू, pineal , भावनिक ग्रंथींचे आणि शरीराला पोषक ग्रंथींचे बिंदू. पेरामध्ये आहे मानसिक आणि मुलाशी आहे मस्तिष्क ग्रंथीचे बिंदू..
           म्हणूनच नमस्कार करताना दोन्ही हात जोडायचे आणि अंगठे सुद्धा... म्हणजे ते बिंदू दाबले जाऊन आपोआप कार्य होतं.. एखादा लाईट लावण्यासाठी बटन दाबावी तसं हे बिंदू दाबून आरोग्याची लाईट लागते!
           आपल्या संस्कृती मध्ये किती बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा विचार केला आहे! नाही?

राम हरवला !!

Posted by मधुरा on 10:51 PM
          वाल्मिकी ऋषी रामायण ग्रंथ लिहित होते तेव्हा त्या ग्रंथाची कीर्ती सगळीकडे पसरली.. हा अद्वितीय ग्रंथ प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला.. त्यामुळे हा ग्रंथ पूर्ण होताच त्याच्या मालकीकरता देव, मानव आणि दानव एखाद्या इस्टेटीकरता भांडावं तसं भांडू लागले! मानवांचा दावा असा होता की, राम हा देव असला तरी तो मानव रुपात अवतरला. म्हणून रामायणावर मानवांचा हक्क आहे. देव म्हणाले की, राम मानव रुपात अवतरला असला तरी तो विष्णूचा अंश आहे, तेव्हा रामायण देवांचे आहे! तर दानवांचे म्हणणे अगदी वेगळे.. ते म्हणतात की रामायण हा दैत्यराज रावणाच्या पराक्रमाचे वर्णन करतो म्हणून रामायण दानवांचे आहे!
           या तिघांच्याही भांडणाला कडाक्याची सुरवात झाली.. कोणीही माघार घेईना.. म्हणून सार्वजन भांडण मिटवायला ब्रह्मदेवाकडे जातात.. पण ब्रह्मदेव म्हणतात, "या भांडणाचा निकाल काढणे मला अशक्य आहे. तुम्ही महादेवांकडे जा!"
           सर्वजण महादेवांकडे जातात आणि भांडणाचा निकाल देण्याची प्रार्थना करतात..
महादेव म्हणतात, "तुमचे तिघांचेही म्हणणे बरोबर आहे. तेव्हा तिघांमध्ये याची समान वाटणी करू!"
महादेव सर्वांची वाटणी बरोबर समान करतात.. शतकोटी श्लोक असलेल्या रामायणाची वाटणी करताना देव, मानव आणि दानव या तिघांच्या वाट्याला प्रत्येकी ३३३३३३३३३ (तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस) श्लोक येतात.
           महादेव म्हणतात, "हे बघा.. समान वाटणी झाली. आता एकाच श्लोक वाटायचा राहिला आहे. या श्लोकाची अक्षरे आहेत बत्तीस.. तेहतीस असती तर प्रत्येकाला अकरा देता आले असते.. पण इथे बत्तीस अक्षरे आहेत तर तुम्हाला दहा दहा अक्षरे देतो आणि दोन अक्षरे मला ठेऊन घेतो.."
           तिघांनीही महादेवाची कल्पना पसंत केली. त्यांनी विचार केला की महादेवांनी पक्षपात न करता आपल्यात वाटणी केली.. आता दोन अक्षरे म्हणजे अगदीच क्षुल्लक गोष्ट आहे! ते द्यायला काही हरकत नाही.. आणि तिघंही महादेवाला ते दोन अक्षरे द्यायला होकार देतात.. हा होकार मिळाल्यावर महादेव काय ठेऊन घेतात माहिती आहे?   "राम"
           म्हणून ज्या रामायणातून राम हरवला आहे त्याची कितीही पारायणं केली तरी काय फायदा? तो राम शोधावाच लागेल!!

असं का करायचं??

Posted by मधुरा on 12:47 AM
          रोज कपाळाला टिकली लावत जा! हातात बांगड्या घाल! हे वाक्य सगळ्या मुलींना रोजचे असतील.. नाही? पण हे असंच का करायचं.. आम्हीच का.. कोणी मोठ्यांना घाबरून तर कोणी आंधळा विश्वास ठेऊन चूप बसतात.. पण या प्रश्नांची जोवर समाधानकारक उत्तरं मिळत नाही तोवर कसं मान्य करायचं? अशाच काही प्रश्नांची मला मिळालेली उत्तरं सांगते..
          आपले अलंकार हे सौंदर्य वाढवतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे? आपली भारतीय संस्कृती म्हणजे चालतं बोलतं विज्ञान आहे! आयुर्वेदात सांगितलेली दाब बिंदू पद्धती(acupressure) आपल्या सर्व अलंकारातून सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे.. इथे प्रत्येकाला आयुर्वेद वाचायला कुठे वेळ आहे? संस्काराच्या रूपाने आपण विज्ञानाचा उपयोग करतो!
          सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे कपाळाला टिकली का लावायची? 
           आधी पुरुष सुद्धा गंध लावायचे! मग आता त्यांना यातून सुटका का? मुलींनाच टिकली लावायला का सांगतात? यावर उत्तर असं की, दोन्ही भुवयांच्या मध्ये जो बिंदू आहे तो रक्तदाब, कपाळदुखी आणि पक्षाघात(paralysis) यापासून दूर ठेवतो.. यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही.. म्हणून आधी दोघेही गंध लावायचे.. तसंच स्त्रियांची कपाळाच्या बरोबर मध्ये टिकली लावण्याची पद्धत होती. कारण तिथे जो acupressure point आहे तो स्त्रियांना होणाऱ्या कमरेच्या दुखाण्यापासून वाचवतो..
           त्यानंतर दुसरा प्रश्न असा की कान का टोचतात?
           बाळ जन्माला आलं की १०-१२ दिवसात मुलगा असो की मुलगी, सोनाराने कान टोचण्याची पद्धत आहे. ते काय त्याचं सौंदर्य वाढवायला?? नाही! हा कानाच्या पाळीवरचा बिंदू दाबला की तिथे असणाऱ्या पेशी कार्यरत होतात, रक्त पुरवठा जोमाने चालू होतो. यामुळे कान-डोळे यांच्या जोडलेल्या नासातून शुद्ध रक्त पुरवठा होऊन बाळाचे डोळेही चांगले राहतात. डोळ्यांना पाणी येणं, कान दुखणं अशा रोगांपासून रक्षण होतं.
         
          सध्या दोनच प्रश्न लिहिलेत.. असे भरपूर प्रश्न उत्तरं आहेत.. ते पुढच्या वेळी लिहीन.. :)

तो तरणार कसा?

Posted by मधुरा on 12:20 AM
          सीतेला मुक्त करायला आणि रावणाचा वध करायला श्रीराम आणि सगळी सेना जेव्हा समुद्रावर सेतू बांधत होते तेव्हाची गोष्ट.. एकदा श्रीराम छावणीतून निघून समुद्रावर जातात. तिथला एक दगड घेतात आणि तो समुद्रात टाकतात. पण तो समुद्राच्या पाण्यावर तरंगत नाही! तो बुडतो.. तेव्हा त्यांना वाईट वाटतं आणि एक उच्छवास टाकतात.. मागून कोणीतरी त्यांच्यापेक्षा जोरात उच्छवास टाकलेला त्यांना ऐकू येतो. वळून बघतात तर हनुमान. आपण टाकलेला दगड बुडला हे कोणीतरी पहिले यामुळे ते खजील होतात..
श्रीराम हनुमानाला विचारतात, "तू इथे कधी आलास?"
हनुमान सांगतो, "मी तर तुम्ही छावणीतून निघाल्यापासून तुमच्या मागेच आहे!"
राम म्हणतात, "मग आता काय झाले ते तू पहिले असशीलच.."
हनुमान सांगतो, "हो.. तुम्ही एक छोटा दगड घेतला आणि आणि तो पाण्यात टाकला.. आणि तो बुडाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटले!"
राम म्हणतात, "पण असे का? माझे नाव घेउन टाकलेले दगड तरले. माझे नाव घेऊन लोक भवसागर तरतात.. आणि मी एक छोटासा दगड टाकला तर तो का बुडावा?"
हनुमान उत्तर देतो, "बरोबरच आहे ना.. रामाने ज्याला धरले तो तरायचाच! पण त्याला रामाने सोडल्यावर तो तरणार कसा? तो तर बुडणारच!"

जाळ्यातला कोळी

Posted by मधुरा on 2:23 AM
वेगवेगळ्या रंगाचे हे spider चे चित्र मी photoshop मध्ये काढले आहे. याचे रंग मला खूप आवडले ते मी चित्रात उतरवण्याचा प्रयत्न केला. हे चित्र काढायला जास्त वेळ नाही लागला. २ तासात हे चित्र काढून झाले.




 हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.
































ओघळणारे पाण्याचे थेंब

Posted by मधुरा on 12:42 AM
photoshop या software मध्ये झाडावर पाण्याचा थेंब कसा दिसतो हे चित्र मी काढलंय. हे चित्र काढायला मला  ३ तास लागले. या चित्राच्या वेगवेगळ्या layers तुम्ही बघू शकता..आणि चित्र कसं बनलंय हे मला नक्की कळवा.






हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.



















रावणाचा वध करू शकेल असा रामाशिवाय त्यावेळी कोणीही राजा नव्हता?

Posted by मधुरा on 12:04 AM
          श्रीरामांनी युद्ध करून रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केले हे सर्वांना माहिती आहे. पण त्या वेळी या पृथ्वीवर एकही असा वीर नव्हता का की जो रावणाचा वध करू शकेल? श्रीरामांना सुद्धा हा प्रश्न पडला. रावणाचा वध करून अयोध्येला आल्यावर सर्वांचे अभिनंदन स्वीकारताना श्रीराम ऋषींना विचारतात, "ऋषीवर्य, रावणाचा पराभव करू शकेल असा त्यावेळी एकही राजा नव्हता का?" हृषी रामाला सांगतात, "राम, रावणाचा पराभव करणारे एकाच नाही तर तीन राजे होऊन गेले! एक, दैत्य कुळात जन्माला आलेला आणि वामनाने पाताळात पाठवलेला बलीराजा. दुसरा क्षत्रिय कुळात जन्माला आलेला सहस्त्रार्जुन. आणि तिसरा वानर कुळात जन्मलेला वाली राजा.
          या तिघांनीही रावणाचा पराभव केलेला होता. पण घडले असे की, बली कडून रावण पराजित झाला तेव्हा रावणाचा पिता विश्रवामुनी अतिथी म्हणून बळीच्या दाराशी गेला आणि याचना करून भिक्षारुपाने रावणाची त्याने मुक्तता करून घेतली. सहस्त्रार्जुनाकडून सुद्धा तशीच मुक्तता करून घेतली. रावणाला जिंकणारा तिसरा वीरपुरुष वानर राजा वाली सोबत रावणाने वेगळी पावले टाकली.
           त्यावेळी वानर राष्ट्र आणि राक्षस राष्ट्र ही दोन्ही बलाढ्य राष्ट्रे होती. पहिले रावणाने स्वतःच वालीवर आक्रमण केले. वालीने त्या आक्रमणात रावणाला हरविले. आपण हरलो हे लक्षात येताच रावणाने वालीसोबत अग्निसाक्ष 'सख्य' करून मैत्रीचे नाते जोडले. या मैत्रीच्या तहात रावणाने मोठ्या हुशारीने वानर राष्ट्राच्या दारात १४००० सैन्य उभे केले.
          रावण आणि वाली यांच्यात असे ठरले की 'आपण एकमेकांचे अग्निसाक्ष मित्र झालो आहोत तेव्हा आपण एकमेकांवर कधीही आक्रमण करायचे नाही. उलट एकमेकांना मदत करायची.' इतकेच नाही तर रावणाने मुत्सद्दीपणे वानर राष्ट्राची उत्तर सीमा निश्चित केली आणि त्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली. पंचवटी या राज्याच्या सीमेशी रावणाने १४००० सैन्य ठेवले आणि खर, दूषण, त्रिशिरा हे मावसभाऊ असलेले पराक्रमी वीर यांच्याकडे त्याचे नेतृत्व दिले. आणि या तिघांवर लक्ष ठेवायला सख्खी बहिण शूर्पणखा हिची योजना केली. मानव आणि वानर राज्यांच्या सीमेवर रावणाने हेतुपूर्वक सैन्य उभे केले. कारण मानव आणि वानर राष्ट्रात मैत्री झाली तर रावणाला धोका उत्पन्न झाला असता!"
           हृषी रामाला पुढे सांगतात की, "रामा, या तिघांनीही रावणाचा प्रभाव केला होता. रावण श्वेतद्वीपात गेला असताना तेथील स्त्रियांनी सुद्धा रावणाचा पराभव केला होता. पण त्याला मारण्यात तुझाच मोठेपणा का.. तर.. या सर्वांच्या बाबतीत झाले काय की, त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पराक्रम सिद्ध केला. शक्तीचा उपयोग स्वतःपुरता केला. पूर्ण त्रिभुवनातील लोकांना रावण त्रास देत होता. त्या लोकांचा त्रास वाचवावा ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. ते महान कार्य तू केलेस.सर्वांना निर्भयता मिळवून दिलीस. सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देण्याकडे पराक्रमाचा उपयोग तू केलास यातच तुझा मोठेपणा आहे.."
          व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या पराक्रमावर नाही तर त्याच्या निर्णयावर असतो.


* ही गोष्ट मी 'वाल्मिकी रामायणावरील प्रवचने' या वं. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुस्तकात वाचली आहे.*

वर्ष प्रतिपदा

Posted by मधुरा on 12:35 AM
          हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होतं. नवीन वर्षाकडे आम्ही पाउल उचललं आहे हे "प्रतिपदा" या शब्दातून कळतं. सूर्योदयाला ध्वजारोहण करावे आणि सूर्यास्ता आधी ध्वजावतरण करावे अशी पद्धत आहे. उजाडणाऱ्या सूर्याचं तेज आणि वैभव ध्वजांनी प्राप्त करावा.. पण गुलामी चाअंधार त्याला स्पर्श करू नये ही त्यामागची भावना आहे. वर्षप्रतीपादेपासून श्रीरामांचे नवरात्र सुरु होतं. तसंच राष्ट्रसंत समर्थ रामदासांचा जन्मोत्सव सुरु होतो. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी सिंहावालोकन करणे आणि वर्ष प्रतिपदेला सूर्योदयाला साक्षी असा आपला ध्वज फडकवून मांगल्यासाठी प्रार्थना करावी...
                     ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद
                     प्राप्तेस्मीन वत्सरे नित्यं मदगेहे मंगलं कुरु

           ही आपली सुमारे ६००० वर्षाची परंपरा आहे. राजा उपरिचर (कुरु वंशाचा पूर्वज) याने इंद्राची युद्धात मदत केली. इंद्राने प्रसन्न होऊन त्याला ध्वज दिला आणि हा श्लोकाची प्रार्थना करायला सांगितले. म्हणून आपल्या पंचांगात या दिवसा समोर वर्षप्रतिपदा सोबतच ध्वजारोपण लिहिलेलं असतं. पूर्वी विजयोत्सव, आनंदोत्सव साजरा करताना ध्वजारोहण करण्याची पद्धत होती.
           वर्षप्रतिपदा हा आपला राष्ट्रीय विजय दिन आहे. विक्रमादित्य राजाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पराक्रमाने आक्रमणकारी शक राजाला  हरून विजय मिळवला होता. आणि लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली. शक राजा खूप क्रूर होता.. त्याला नवीन वर्षाला तरुण सुंदर मुली भेट द्याव्या लागत असे.. काही ठिकाणी गुलामीचं प्रतिक म्हणून वर्षाप्रतीपादेला ध्वजाच्या ऐवजी शक राजाच्या आसुरी विजयाचं प्रतिक बायकांचे वस्त्र फडकावण्याचे आदेश शक राजाने दिले होते. शक राजाला माहित होते की भगवा ध्वज जोवर सर्वांसमोर आहे तोवर लोकं आपल्या राष्ट्राचा इतिहास विसरणार नाही. म्हणून त्याने ध्वजा ऐवजी साडी फडकवण्याचा आदेश दिला. पण विक्रमादित्य राजाने विजय मिळवला आणि स्त्रियांना त्यांचा सन्मान परत मिळवून दिला. पुन्हा एकदा घरा-घरावर भगवा ध्वज फडकू लागला.
           वर्षाप्रतीपादेला कडूलिंब खाण्याची पद्धत आहे. कादुलीम्बाची नवीन पाने घेऊन त्यात मीठ, हिंग, जिरे, चिंच हे सगळा मिसळून चटणी बनवतात आणि पहाटे प्रसाद म्हणून खातात. वर्षाप्रतीपादेनंतर उन वाढत जातं.. त्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कडुलिंबाचे सेवन केले जाते. तसंच कडू गोष्टी खाल्ल्यावरच गोड अनुभव मिळतो असा संदेश त्यामागे आहे..
           तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच गोड अनुभव यावेत ही सदिच्छा.. वर्षाप्रतीपादेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

ध्रुव

Posted by मधुरा on 11:47 PM
          तुम्हाला ध्रुव तारा माहिती आहे नं? त्याचीच ही गोष्ट. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती... एक नावडती... आवडत्या राणीचं नाव सुमती. आणि नावडत्या राणीचं नाव सुनीती. सुनीतीचा मुलगा ध्रुव. आवडत्या राणीचं मुलगा सुद्धा आवडताच असतो.. आणि नावडत्या राणीचं मुलगा नावडता!! ध्रुव ला सुमती चा मुलगा राजाजवळ जाऊ देत नव्हता. राजाकडून फक्त स्वतःचे लाड करून घ्यायचा! सतत राजाच्या जवळ असायचा.. मग ध्रुव ला राजाच्या जवळ जाण्याची संधीच मिळायची नाही! एकदा राजाच्या जवळ कोणी नाही असं बघून ध्रुव राजाजवळ जातो.. राजा ध्रुव ला मांडीवर बसून त्याचे लाड करत असतो.. तेवढ्यात राजाची आवडती राणी सुमती येते. ध्रुव ला राजाच्या मांडीवर बसलेला बघून तिला राग येतो.. ती ध्रुव ला राजाच्या मांडीवरून खाली ओढते.. आणि तिथून त्याला हाकलून देते!
          ध्रुव ला खूप वाईट वाटतं.. तो आई जवळ जातो आणि रडत रडत सगळं सांगतो.. आणि विचारतो, "मला बाबा का नाही लाडवत ग? मला का त्यांच्या जवळून ढकलून दिलं?" सुनीती ध्रुव ला जवळ घेते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते.. त्याला सांगते, "बाळा, मी आहे न तुला लाडवायला... आणि देवबाप्पा पण आहे नं.. तू त्याला विचार. तो तुला नाकी सांगेल.." ध्रुव आई ला विचारतो, "देवबाप्पा ला कसं विचारू? तो कुठे भेटेल मला?" सुनीती सांगते, "देवाशी बोलायचं असेल तर खूप तपश्चर्या करावी लागते.." ध्रुव विचारतो, "तपश्चर्या कशी करतात?" सुनीती त्याला सांगते, "तपश्चर्या करायला एकांत असावा लागतो.. त्यासाठी जंगलात जावं लागतं. आणि तिथल्या अन्नावर राहून देवाचं नाव घ्यायचं असतं..
          रात्री आई झोपली आहे असं बघून ध्रुव चुपचाप बाहेर पडतो.. आणि जंगलाकडे जायला लागतो.. आईनी सांगितल्या प्रमाणे तो तिथलं अन्न खाऊन देवाची तपश्चर्या करतो. असे खूप दिवस जातात.. पण ध्रुव तपश्चर्या थांबवत नाही. निरंतर त्याची तपश्चर्या सुरु असते. आणि एक दिवस विष्णू प्रसन्न होतात आणि ध्रुव ला दर्शन देतात आणि विचारतात, "बाळा, तू इतका लहान असून का इतकी तपश्चर्या करतोय? काय हवंय तुला?" ध्रुव म्हणतो, "देवा मला माझी सावत्र आई बाबांजवळ जाऊ देत नाही.. मी बाबांजवळ गेलो होतो तेव्हा मला त्यांच्या जवळून हाकलून दिले.. आई म्हणाली देवाला विचार.. तूच संग देवा.. मला का हाकलून दिलं?" ध्रुव रडायला लागतो... इतका लहान मुलगा तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करतो आणि हळवा होऊन रडायला लागतो.. हे बघून देवाला गहिवरून येतं. देव ध्रुव ला जवळ घेऊन समजावतात आणि विचारतात, "तू तपश्चर्या करून मला प्रसन्न केलं आहे. तुला काय हवं ते सांग." ध्रुव देवाला म्हणतो, "देवा मला अशी जागा दे जिथून मला कोणीही हाकलू शकणार नाही." देव त्याला म्हणतात,"तथास्तु"
          देव ध्रुव ला अढळपद देतात. तिथून त्याला कोणीही हलऊ शकत नाही.ध्रुवनी आपल्या कठीण तपश्चर्येने अढळपद मिळवले. आकाशात नेहमी एकाच जागेवर दिसणारा ध्रुव तारा हाच आपल्या गोष्टीतला ध्रुव.

व्यक्तिरेखा चित्र

Posted by मधुरा on 11:22 PM
आज जे व्यक्तिचित्र लावलं आहे ते माझ्यासाठी एक आव्हान होते ... म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवायच्या, त्याच्या दाढी मिशा बनवायच्या आणि ते चित्र खरे आहे हे भासवायचं... पण मी पूर्ण प्रयत्न केला आणि हे चित्र बनवले.. हे चित्र मी कसं बनवलं ते वेगवेगळ्या layers मध्ये बघू शकता...



हे चित्र मी कसं बनवलं ते खाली layer मध्ये बघू शकता.