असं का करायचं?? (भाग २ )

Posted by मधुरा on 11:12 PM

           'असं का करायचं' या पहिल्या post मध्ये मी २ प्रश्न लिहिले होते. गंध का लावायचं? कान का टोचायचे? मला मिळालेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरं लिहिते आहे.
           बाळाला मनगट्या, स्त्रीने बांगड्या आणि पुरुषांनी कडे घालण्याची पद्धत का होती?
बाळाचा जन्म झाला की त्याला/तिला मनगट्या, करदोडा, साखळी, अंगठी घालतात.. त्यातल्या मनगट्या पुढे स्त्रीसाठी बांगड्या आणि पुरुषासाठी कडे बनतात.. बाळाला काय कळतात अलंकार? नाही का? पण ते त्याच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.. हातात अलंकार घालताना मनगटावरील बिंदू ५-६ सेकंद तरी दाबले जातात.. डाव्या हातावर हृदयाचे, शक्तीचे, श्वासाचे आणि आरोग्य रक्षण करणारे बिंदू आहेत.. तर उजव्या हातावर पुरुषांचे प्रोस्टेट ग्रंथीचे, आणि मुलींच्या गर्भाशयाचे बिंदू आहेत..... पाहिलंत? एका छोट्या अलंकारामागे कसे आरोग्य विज्ञान आहे!!
           बाळ अंगठा का चोखतो?
          बाळाने अंगठा चोखला की त्याच्या मेंदूतील अभिसरणाला चालना मिळते.. अंगठ्यावर आहेत मेंदू, pineal , भावनिक ग्रंथींचे आणि शरीराला पोषक ग्रंथींचे बिंदू. पेरामध्ये आहे मानसिक आणि मुलाशी आहे मस्तिष्क ग्रंथीचे बिंदू..
           म्हणूनच नमस्कार करताना दोन्ही हात जोडायचे आणि अंगठे सुद्धा... म्हणजे ते बिंदू दाबले जाऊन आपोआप कार्य होतं.. एखादा लाईट लावण्यासाठी बटन दाबावी तसं हे बिंदू दाबून आरोग्याची लाईट लागते!
           आपल्या संस्कृती मध्ये किती बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा विचार केला आहे! नाही?