दोन चिमुकले जीव

मैत्रिणीनी त्या पिल्लांना घरी नेलं आणि त्यांना सांभाळायचं ठरवलं.. पण ते पिल्लू इतके छोटे होते की तिला त्यांना काय खाऊ घालावं कळेना! ते काहीच खात पीत नव्हते.. त्यांना कसं सांभाळावा ते तिला कळत नव्हतं.. म्हणून आम्ही त्या पिल्लांना आमच्या घरी घेऊन आलो.. लहान पिल्लांना कापसाच्या बोळ्यानी दुध देतात असं आईनी सांगितलं.. तर खरंच कापसाचा बोळा त्यांच्या जवळ नेताच त्यांनी दुध घेतले!
खारीसारख्या छोट्याशा सुंदर प्राण्याला हातात घ्यायची खूप इच्छा होती.. पण इतका चपळ प्राणी चाहूल लागताच पळून जातो तर हातात कसा येणार? पण ती इच्छा पूर्ण झाली! गेले २ दिवस ते पिल्लू आमच्या घरी आहेत.. इतक्या छोट्याश्या जीवाला हाताळताना.. त्यांना खाऊ घालताना.. त्यांना इकडून तिकडे पळताना बघून किती आनंद वाटतो हे सांगू नाही शकत.. प्रत्येक क्षणाला मैत्रिणीचं कौतुकच वाटतं.
ते पिल्लू इतक्या थोड्या वेळात कुटुंबाचा एक भाग झाले आहेत.. इतक्या नाजूक.. छोट्या पिल्लांचे नाव काय ठेवायचे ते अजून सुचले नाही... तुम्ही सुचवा... आणि त्यांची काळजी घेताना काय लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगा.. :)
लहानपणी खारीचं अगदी छोटं पिल्लू आम्ही पाळलं होतं - असंच आईविना सापडलेलं. त्याला आयड्रॉपच्या ड्रॉपरने दूध पाजायचो. तेही मस्त मजेत असावं असं वाटायचं - पण म्हशीचं दूध त्याला पचलं नाही ...१ -२ आठवड्यात गेलं ते. :( तेंव्हा शक्यतो गायीचं, पाणी मिसळून पातळ केलेलं दूध द्या.
thank u gouri.. :)