कानोले

Posted by मधुरा on 1:13 AM

साहित्य :-

कणिक   ३ कप.
तूप      आवश्यकतेनुसार
पाणी   आवश्यकतेनुसार

कृती :-

* कणिक पाण्याने भिजवा. (सैल किव्वा खूप घट्ट नको)
* पोळी लाटून त्यावर तूप लावा.
* पोळीच्या ३ घड्या करून पुन्हा लाटा.
* ही पोळी वाफवून घ्या. (भांड्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यावर चाळणीत पोळी वाफवा.)
* पोळी चाळणीतून काढल्यावर लगेच तिचे पापुद्रे मोकळे करा. (मोठी गोल पोळी बनेल.)
* आता हे कानोले बासुंदी सोबत serve करा.

टिप :- आधी भिजऊन ठेवलेली कणिक कानोले करण्यासाठी वापरू नका.