शाही पनीर

Posted by मधुरा on 1:15 AM



साहित्य :-

पनीर    २५० ग्रॅम
कांदे      ४
टोमॅटो पेस्ट   १/२ कप
तूप       १ टे- स्पून
खवा     ५० ग्रॅम
काजू    १४-१५
बदाम   १०
शेंगदाणे  १५-२०
पांढरे तीळ  २ टी- स्पून
खसखस    १ टी- स्पून
विलायची   ५-६
लवंग    २-३
सोप     १ टी- स्पून
मिरे     २-३
जिरे    १ टी- स्पून
आले, लसून, मिरची पेस्ट  २ टी- स्पून
तेजपान  १
कलमी    १

कृती :-

* कांदे वाफवून त्याची पेस्ट करा.
* काजू, बदाम, शेंगदाणे, तीळ, खसखस १५ मिनिटे भिजवून त्याची पेस्ट करा.
* विलायची, लवंग, सोप, मिरे एकत्र बारीक करा.
* पनीर वाफवून घ्या आणि छोट्या फोडी करा.
* कढईत तूप गरम करून तेजपान, कलमी घाला.
* कांद्याची पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्या.
* टोमॅटो पेस्ट आणि विलायची पावडर, गरम मसाला घाला.
* काजू, बदाम पेस्ट घाला.
* ग्रेवी शिजली कि खावा, थोडे काजूचे तुकडे आणि पनीर mix  करा.