मसाल्याचे वांगे

Posted by मधुरा on 1:30 AM



साहित्य :-

छोटे वांगे    ४-५
बारीक चिरलेला कांदा   २
आले लसून पेस्ट  २- टी स्पून
टोमॅटो पेस्ट   १/२ कप
धणेपूड       २ टी- स्पून
तिखट        १ टी- स्पून
जिरे           १/२ टी- स्पून
आमचूर     १/२ टी- स्पून
कोथिंबीर   सजवण्यासाठी
मीठ         चवीनुसार

कृती :-

* वांगे स्वच्छ धुवून ४ भागात चिरा.
* लसून, कांदे आले, हळद, धणे, आमचूर आणि मीठ एकत्र बारीक करा आणि वांग्यात भरा.
* तेल गरम करून जिरे, मिरची आणि कांद्याची फोडणी द्या. सर्व मसाले घाला.
* कांदे झाल्यावर वांगे घालून परतून घ्या.
* पाणी घालून झाकण ठेवा आणि वांगे शिजऊन घ्या.
* वांगे शिजले की वरून कोथिंबीर घाला.