कच्च्या केळाची भाजी
साहित्य :-
कच्ची केळी ३
मिरच्या ३-४
नारळ १
कांदे ३-४
हळद, मोहरी, जिरे, मीठ चवीनुसार
कढीपत्ता पाने ५-६
कृती :-
* केळांची साले काढून छोटे तुकडे करा.
* थोड्या ताकात स्वच्छ धुवा.
* मिरची ची पेस्ट आणि हळद केल्याच्या फोडींना लाऊन ठेवा.
* थोड्या पाण्यात मीठ घालून फोडी मंद आचेवर शिजवा.
* फोडी शिजल्या कि पाणी आटवून फोडी कोरड्या करा.
* १/२ नारळाचा कीस आणि जिरे केळाच्या फोडी सोबत pan मध्ये घाला आणि परतून घ्या.
* आता तेल, मोहरी, हळद याची फोडणी तयार करा.
* कांदा घालून परतून घ्या.
* उरलेला खोबऱ्याचा कीस घालून परतून घ्या.
* त्यात शिजलेल्या केळाच्या फोडी टाकून mix करा.
0 Responses to "कच्च्या केळाची भाजी"
Leave A Comment :