विरुद्ध आहार भाग २

Posted by मधुरा on 4:38 AMदुध :-
दुधासोबत दही, मीठ, आंबट पदार्थ, चिंच, खरबूज, मुळा, दोडके, बेल, आंबट फळे, सातू, फणस, तळलेले पदार्थ खाऊ नये.

दही :-
दह्यासोबत दुध, खीर, पनीर, गरम जेवण, केली, खरबूज, मुळा हानिकारक आहे.

तूप :-
तुपासोबत थंड दुध, थंड पाणी आणि सम-प्रमाणात मध हानिकारक आहे.

खीर :-
खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस आणि सातू घेऊ नये.

मुळा :-
मुळ्यासोबत गुळ खाणे नुकसानदायक आहे.

मध :-
मधासोबत मुळा, खरबूज, सम-प्रमाणात तूप, द्राक्षे, गरम पाणी हानिकारक आहे.

फणस :-
फणसानंतर पान खाऊ नये.

गरम पाणी :-
गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये.