पालक सूप

Posted by मधुरा on 10:33 PM



साहित्य :-

पालक  १ जुडी
कांदा    १
टोमॅटो  १
मिरच्या  २
 आले   १/२ inch
जिरे     १/२ टी- स्पून
पाणी    १ कप
मीठ      चवीनुसार

कृती :-

* पालक नीट स्वच्छ करून घ्या. टोमॅटो, कांदा आणि मिरच्या बारीक चिरा.
* हे सर्व साहित्य एकत्र १० मिनिटे शिजवा. आणि थंड करा.
* आता या मिश्रणातून पाणी काढून घ्या आणि mixer मधून पेस्ट करा.
* तयार पेस्ट मध्ये थोडे पाणी घालून ५ मिनिटे शिजवा.
* बटर घालून सजवा आणि गरम गरम serve  करा.