गाजर- बदाम सूप

Posted by मधुरा on 10:24 PM

साहित्य :-

गाजर   ४
बदाम   १०-१२
कांदा    १
तेल      २ टी-स्पून
पातीचा कांदा  १
मिरे पावडर    १/४ टी- स्पून
मीठ     चवीनुसार
कुरकुरीत ब्रेड चे तुकडे  ४-५
आणि तुमच्या जवळ तयार असलेल्या भाज्या  १/२ कप

कृती :-

* आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्यात ३-४ बदाम घालून mixer मधून पेस्ट करा. 
* तेल गरम करायला ठेवा. गरम झाले की त्यात कांदा, पातीचा कांदा परतून घ्या.
* आता बदाम आणि गाजर टाका आणि 2 मिनिट शिजवून घ्या.
* मीठ, मिरे पावडर आणि ब्रेड mix करा आणि परतून घ्या.
* आता ४ कप पाणी घालून १० मिनिट शिजवा.
* आपण केलेली भाज्यांची पेस्ट सूप मध्ये mix करा आणि ३-४ मिनिटे शिजवा.
* आता गरम गरम सूप serve करा.