वर्ष प्रतिपदा

Posted by मधुरा on 12:35 AM

          हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होतं. नवीन वर्षाकडे आम्ही पाउल उचललं आहे हे "प्रतिपदा" या शब्दातून कळतं. सूर्योदयाला ध्वजारोहण करावे आणि सूर्यास्ता आधी ध्वजावतरण करावे अशी पद्धत आहे. उजाडणाऱ्या सूर्याचं तेज आणि वैभव ध्वजांनी प्राप्त करावा.. पण गुलामी चाअंधार त्याला स्पर्श करू नये ही त्यामागची भावना आहे. वर्षप्रतीपादेपासून श्रीरामांचे नवरात्र सुरु होतं. तसंच राष्ट्रसंत समर्थ रामदासांचा जन्मोत्सव सुरु होतो. फाल्गुन आमावस्येच्या दिवशी सिंहावालोकन करणे आणि वर्ष प्रतिपदेला सूर्योदयाला साक्षी असा आपला ध्वज फडकवून मांगल्यासाठी प्रार्थना करावी...
                     ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद
                     प्राप्तेस्मीन वत्सरे नित्यं मदगेहे मंगलं कुरु

           ही आपली सुमारे ६००० वर्षाची परंपरा आहे. राजा उपरिचर (कुरु वंशाचा पूर्वज) याने इंद्राची युद्धात मदत केली. इंद्राने प्रसन्न होऊन त्याला ध्वज दिला आणि हा श्लोकाची प्रार्थना करायला सांगितले. म्हणून आपल्या पंचांगात या दिवसा समोर वर्षप्रतिपदा सोबतच ध्वजारोपण लिहिलेलं असतं. पूर्वी विजयोत्सव, आनंदोत्सव साजरा करताना ध्वजारोहण करण्याची पद्धत होती.
           वर्षप्रतिपदा हा आपला राष्ट्रीय विजय दिन आहे. विक्रमादित्य राजाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पराक्रमाने आक्रमणकारी शक राजाला  हरून विजय मिळवला होता. आणि लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली. शक राजा खूप क्रूर होता.. त्याला नवीन वर्षाला तरुण सुंदर मुली भेट द्याव्या लागत असे.. काही ठिकाणी गुलामीचं प्रतिक म्हणून वर्षाप्रतीपादेला ध्वजाच्या ऐवजी शक राजाच्या आसुरी विजयाचं प्रतिक बायकांचे वस्त्र फडकावण्याचे आदेश शक राजाने दिले होते. शक राजाला माहित होते की भगवा ध्वज जोवर सर्वांसमोर आहे तोवर लोकं आपल्या राष्ट्राचा इतिहास विसरणार नाही. म्हणून त्याने ध्वजा ऐवजी साडी फडकवण्याचा आदेश दिला. पण विक्रमादित्य राजाने विजय मिळवला आणि स्त्रियांना त्यांचा सन्मान परत मिळवून दिला. पुन्हा एकदा घरा-घरावर भगवा ध्वज फडकू लागला.
           वर्षाप्रतीपादेला कडूलिंब खाण्याची पद्धत आहे. कादुलीम्बाची नवीन पाने घेऊन त्यात मीठ, हिंग, जिरे, चिंच हे सगळा मिसळून चटणी बनवतात आणि पहाटे प्रसाद म्हणून खातात. वर्षाप्रतीपादेनंतर उन वाढत जातं.. त्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कडुलिंबाचे सेवन केले जाते. तसंच कडू गोष्टी खाल्ल्यावरच गोड अनुभव मिळतो असा संदेश त्यामागे आहे..
           तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच गोड अनुभव यावेत ही सदिच्छा.. वर्षाप्रतीपादेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...